या हो या, पकवान खा....
दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीबद्दल काय आणि किती बोलावं. इथल्या मोसमांप्रमाणेच इथल्या खाद्यपदार्थांची विविधता खाण्यात फारसा रस नसलेल्यांनाही चटोरं बनवते. वेगवेगळ्या प्रदेशातून येऊन दिल्लीला स्थायिक होणार्यांनी आपल्याबरोबर आपल्या प्रदेशातील खाद्यपदार्थांचे मासले दिल्लीत आणले. खुद्द दिल्लीतल्या लोकांचे, पुराण्या दिल्लीतल्या पक्वान्नांची मिजास वेगळी. पाश्चात्य आणि इतर विदेशी खाद्यपदार्थांचा खुमासदारपणा आगळा आणि या सर्वांसोबत ग्लोबल कल्चरसारखे उगवलेले, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे, पोट भरणारे, रस्तोरस्ती, चौका-चौकात विकले जाणारे पदार्थ वेगळे. आणि या सगळ्या पदार्थांची जत्राही अनोखीच. गेल्या काही वर्षांपासून ही जत्रा दिल्लीत भरते. खाद्यशौकीनांसाठी पर्वणी ठरणार्या या जत्रेतील का दृश्यं.
![]() |
| खाद्यजत्रेची माहिती देणारं पोस्टर |
![]() |
| हे प्रवेशद्वार. किंवा बाहेर जाण्याचा मार्ग. एका सरळ रस्त्यावर भरलेल्या जत्रेमुळे दोन द्वारांचा आत शिरण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठीही वापर करता येई. |
![]() |
| खा खा कोण जास्त खाईल तो... |
![]() |
| थोडं जास्त खाणं झालं की मग गोळ्या-चूर्णांची गरज भासणारच ना! |
![]() |
| चीप म्हणजे किंमतीत बरं का. पुणेरी पाट्या आपण पाहिल्या, कधी जमलं तर दिल्लीकरांच्या पाट्या पाहाव्यात. किंबहुना विनोदबुद्धी असलेले पाट्या रंगवणारे रंगारी सगळअयाच शहरात असतात न्ककीच. |
![]() |
| मित्रमंडळी सोबत असली की अशा ठिकाणची भ्रमंती विशेष आनंददायी ठरते. |
![]() |
| .....आणि अशा तारकांनी सजलेल्या पदपथावरगुलाबी थंडीत हातात हात घेऊन, वातावरणात दरवळणारा काद्यपदार्थांचा सुगंध हुंगत मारलेला फेरफटका अविस्मरणीय. |
![]() |
| या फोटोला उभा करण्याचे माझे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. सुंदर केसांत एकादी रंगीत बट माळून देणारी ही कला खूपच इंटरेस्टिंग. |
![]() |
| आरामात बसा, खा, प्या. दुकान आपलंच आहे. मात्र आधी कूपन घ्यायला विसरू नका बरं. |
![]() |
| इथे रांगेत उभं रहाणं मात्र खटकणारं अजिबात नाही बरं. |
![]() |
| चारही बाजूंनी स्टॉल्स आणि मध्ये अशी बसण्याची व्यवस्था. थंड वातावरण. वाफाळलेल्या डिशेस. गरम आणि थंड. चिकन कोरमाबरोबर इथे कुल्फीही ठेवलेली. थंडीत कुल्फी खाण्याची मजा काही औरच. निवांत संध्याकाळ घालवण्यासाठी असा थाट पथ्यावर पडणारा. |
![]() |
| लोक खाण्यातच गुंतलेले. पानाकडे कुणाचं फारसं लक्ष नव्हतं. |
![]() |
| ही दिल्लीची सायकल-रिक्शा. दिल्लीच्या काही पॉश भागातून हिचं उच्चाटन झालंय, पण इतर ठिकाणी अजूनही भाव वधारलेलाच आहे. इथे चंदेरी बटांनी सजवून उभी केलीय. |
![]() |
| इतर मंडळी खाण्यात गुंतलेली असताना थोडा विसावा घेणारी अशीही मित्रमंडळी. |
![]() |
| आपल्या गल्लीत खाल्ले किंवा खाद्य जत्रेत खाल्ले तरी चाटवाल्या डिशएसची चव नेहमीच जिभेवर रेंगाळणारी. मस्त. |
![]() |
| आणि ही बोंबे भेलपुरी. चवीमुळे नव्हे तर किंमतीमुळे तोंडचं पाणी पळवणारी. असो बापडी. दिल्लीत मुंबईची चव स्वस्तात कशी मिळणार म्हणा. किंमत जास्त न् चवही अगदीच सुमार होती या भेळीची. |
![]() |
| गर्दी खेचणारे पुरानी दिल्लीचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी लागलेली रांग. |
![]() |
| सजलेला मार्ग! |
![]() |
| ऑफिसनंतर घरी परतण्याआधी सुटाबुटात बिनधास्त कट्टयावर बसून पक्वान्नांचा फडशा पाडताना चवीची गोडी जास्तच जाणवत असावी. |
![]() |
| कोक-पेप्सींचे स्टॉल असे ओस पडलेले पाहून जिवाला किती बरं वाटलं म्हणून सांगू.... |
![]() |
| थोडी खरेदी... |
![]() |
| मस्त खाण्यानंतर मस्त मनोरंजन. दिल्लीचे विविध लोकनृत्यप्रकार दाखवणार्या मंडळींनी त्या दिवशी लोकांची मनं जिंकली. |
![]() |
| बल्ले बल्ले! |
![]() |
| पुन्हा भेट... पुढल्यावर्षी. |
























